About Us
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणेकरीता पोलीस नियंत्रण कक्षाची महत्वाची भुमिका असते. त्या करीता आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन, विविध शाखा, मुख्यालय यांचेशी समन्वय ठेवणे तसेच आयुक्तालयातील सर्व महत्त्वाच्या घडामोडीबाबत वरिष्ठांना अवगत करणे, नियंत्रण कक्ष कायदा व सुव्यस्थेचे देखभाल सुनिश्चित करते. पोलिस आयुक्तालयाचे हद्दीत कोठेही काही अप्रिय/अनुचित घटना घडल्यास तात्काळ माहिती प्राप्त करून घेऊन वरिष्ठांना अवगत करणे, त्यांचे सुचनांप्रमाणे संबंधित सर्व पोलीस यंत्रणांना घटनास्थळी रवाना होणेबाबत समन्वय ठेवणे, मदतीकरीता अतिरिक्त मनुष्यबळ, वाहने, साधनसामुग्री इ. आवश्यकतेनुसार पुरवणेकरीता समन्वय ठेवणे. घटनेचे गांभिर्य ओळखून तात्काळ निर्णय घेऊन कार्यवाही घेणे ही कामे नियंत्रण कक्षामार्फत अहोरात्र सुरु असतात.
पोलीस नियंत्रण कक्ष येथे नागरिकांकरिता विविध हेल्प लाईन्स उपलब्ध करून देण्यात आले आहे .
१०० क्र.ची हेल्प लाईन :-ह्या सुविधेकरता ७ दुरध्वनी लाईन्स कार्यरत असून त्याकरिता ७ स्वतंत्र कर्मचारी २४ x ७ नियुक्त केले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून नागरिक १०० क्र वर कॉल करून पोलीसांची मदत मिळवू शकतात. संकटाचे वेळी मदत हवी असल्यास किंवा काही महत्वाची माहिती पोलिसांना द्यावयाची असल्यास नागरिकांनी सदर हेल्प लाईन चा वापर करावा. सदर हेल्पलाईन वर आलेल्या कॉल बाबत कर्मचारी नोंदी घेतात. व नियंत्रण कक्ष अधिकाऱ्यांना तात्काळ कळवितात नियंत्रण कक्ष अधिकारी त्याबाबत त्वरित निर्णय घेऊन कॉल करणाऱ्या व्यक्तीस ताबडतोब मदत मिळणेबाबत कार्यवाही घेतात . मदत वेळेत मिळणेबाबत खात्री केली जाते .
फोन अ फ्रेंड :-हि सुविधा पोलीस नियंत्रण कक्ष याठिकाणी नागरिकांचा अभिप्राय घेण्याकरिता सुरु करण्यात आली आहे . पोलीस स्टेशन स्तरावर प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकारी /कर्मचाऱ्यांकडून नागरिकांच्या तक्रारी अथवा अडचणींचे निराकरण केले जाते . त्यामुळे तक्रारदार नागरिकांचे समाधान झाले किंवा नाही . याबाबत आपले अभिप्राय नागरिक फोन अ फ्रेंड या सुविधेद्वारे कळवु शकतात.
जेष्ठ नागरिक व महिलांकरिता हेल्प लाईन :-जेष्ठ नागरिक व महिलाच्या मदतीकरिता दोन स्वतंत्र हेल्प लाईन क्रमांक नियंत्रण कक्ष येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत . सदर सुविधा हि २४ तास उपलब्ध असून त्याकरिता ,मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे . जेष्ठ नागरिक व महिलांना प्राधान्याने प्रतिसाद देऊन आवश्यकतेनुसार तात्काळ मदत पुरविली जाते.
१) जेष्ठ नागरिक हेल्प लाईन क्र :- १८००-२००-२१२२
२) महिलांकरिता हेल्प लाईन :- १०३
३)नियंत्रण कक्ष व्हाट्सएप नं . :-८४२४८२०६८६ / ८४२४८२०६६५