About Us
चारित्र्य पडताळणी विभाग
दि. 24.04.2018 रोजी पासून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून नागरीकांना विहीत वेळेत चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र आॅनलाईन देण्याची सुविधा https://aaplesarkar.mahaonline.gov.in किंवा https://pcs.mahaonline.gov.in या वेबसाईटवर सुरू करण्यात आलेली असून नागरीकांनी फाॅर्म भरतेवेळी त्यांनी तयार केलेल्या युजर आयडीवर त्यांचे चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र उपलब्ध होत आहेत. खाजगी चारित्र्य पडताळणीसाठी 123 रूपये, सुरक्षा रक्षक चारित्र्य पडताळणीसाठी 223 इतका सरकारी भरणा आॅनलाईन रावा लागतो.
विदेषी नागरीक विभाग (F.R.O.)
- विदेषी नागरीकांची नोंदणी, व्हिसा मुदतवाढ, व्हिसा संबधित इतर सुविधा इ. कामकाज सन 2013 पासून आॅनलाईन पध्दतीने करण्यात येत आहे. सदरची आॅनलाईन सुविधा https://indianfrro.gov.in/eservices/ या वेबसाईटवर सुरू करण्यात आलेली असून दि. 01.10.2018 पासून विदेषी नागरीकांचे व्हिसा संबधित सर्व कामकाज Faceless, Cashless and Paperless पध्दतीने करण्यात आले आहे. आता विदेषी नागरीक यांना एफ.आर.ओ.कार्यालयात येण्याची गरज भासत नाही. सविस्तर माहिती सदर वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- नवी मुंबई आयुक्तालयातील शैक्षणिक संस्था आॅनलाईन FORM-S पध्दतीने जोडण्यात आलेली असून सदर विदेषी नागरीक हे https://indianfrro.gov.in/sform/या वेबसाईटवर जावून भरतात.
- विदेषी नागरीकांच्या वास्तव्याची ठिकाणे हाॅटेल्स/गेस्ट हाउस/हाॅस्पीटल/धर्मषाळा/ आश्रम/सव्र्हिस अपार्टमेंट हे आॅनलाईन FORM-C पध्दतीने जोडण्यात आलेली आहेत. सदर विदेषी नागरीक हे https://indianfrro.gov.in/frro/FormCया वेबसाईटवर जावून भरतात.
सरकारी चारित्र्य पडताळणी विभाग
सरकारी नोकरीत रूजू होणा-या अधिकारी/कर्मचारी यांची चारित्र्य पडताळणी बाबतचा प्रस्ताव संबधित सरकारी कार्यालयातून टपालाद्वारे पोलीस आयुक्त नवी मुंबई कार्यालयात येत असतात तदनंतर सदरची प्रकरणे आवक रजिस्टरला नांेद करून अर्जदार राहत असलेल्या संबधित पोलीस ठाणेस पडताळणीसाठी पाठविली जातात. तदनंतर पोलीस रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर तसा अहवाल संबंधित सरकारी कार्यालयात टपालाद्वारे पाठविण्यात येतो.
पारपत्र कार्यप्रणाली
- नवीन पारपत्रासाठी अर्जदार http://www.passportindia.gov.in हया संकेत स्थळावर जावून पारपत्र अर्ज सादर करीत असतात.
- पारपत्र अर्ज भरण्यासाठी पहिल्यांदा स्वतःचा युजरआयडी तयार करून, तदनंतर लाॅग-ईन करून अर्जदार यांनी आपली वैयक्तीक माहिती भरावी. सदर वेबसाईटवर पासपोर्टबाबत Fresh/Reissue/Damage/Lost यापैकी जी सेवा पाहिजे त्यावर क्लिक करण्यात यावे.
- त्यानंतर सदरच्या फाॅर्मची प्रिंट घेवून आवष्यकत्या कागदपत्रांचा एक मुळ संच व एक झेराॅक्स संच असे दोन संच संबधित पासपोर्ट सेवा केंद्र, ठाणे, मालाड, मुंबई, लोअर परेल, अंधेरी, नाषिक सादर करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या दिनांक व तारखेला उपस्थित रहावे.
- नाॅर्मल पारपत्रासाठी 1500 रूपये व तात्काळ पारपत्रासाठी 3500 रूपये इतका सरकारी भरणा आॅनलाईन करावा लागतो.
- अर्जदार यांचा आॅनलाईन फाॅर्म संबधित पासपोर्ट सेवा केंद्र कार्यालय येथे जमा झाल्यानंतर सदरचा अर्ज अर्जदार राहत असलेल्या परिक्षेत्रात येणा-या पोलीस ठाणे येथे आॅनलाईन पाठविण्यात येतो.
- त्यानंतर संबधित पोलीस ठाणेचे गोपनीय पोलीस कर्मचारी त्यांना पडताळणी करण्यासाठी देण्यात आलेले एम-टॅब प्रणालीद्वारे अर्जदाराची पडताळणी करण्यासाठी स्वतः अर्जदाराच्या घरी जावून त्याची पडताळणी करून अहवाल आॅनलाईन एम-पासपोर्ट प्रणालीद्वारे इकडील कार्यालयात पाठवितात. त्यांनतर सदरचा अर्ज अद्यायावत करून प्रादेषिक पारपत्र कार्यालय, मुंबई येथे पाठविण्यात येतो.
- त्यानंतर अर्जदार यांचा पारपत्र प्रिंटींग होवून 21 दिवसाच्या आत ते वास्तव्यास असलेल्या ठिकाणी पोस्टाद्वारे पाठविण्यात येते.
CITIZEN'S FACILITATION CENTRE OFFICE CONTACT NO.
- 022-27572236 (EXT. NO.- 424 / 446 )